🔺येवतीच्या जिल्हा परिषद शाळेत सातव्या वर्गात शिकणाऱ्या मनकर्ना गुरलोड ने सापडलेले पाच ग्राम सोने केले परत .
धर्माबाद : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातव्या वर्गात शिकणाऱ्या कु. मनकर्ना सुदर्शन गुरलोड या मुलीला आज सकाळी येवतीच्या बसस्थानकाजवळ असलेल्या सातव्या वर्गासमोर पाच ग्राम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसुत्र सापडले. ते तिने प्रामाणिकपणे शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी मनुरे यांच्याकडे जमा केले. हरवलेल्या या सोन्याच्या मनी मंगळसुत्राबाबत गावात चौकशी केली असता सौ. सुशीला नारायण गुरलोड या महिलेचे असल्याचे कळल्यावर सदरिल महिलेला शाळेत बोलावून परीपाठ संपल्यानंतर सर्व विद्यार्थी आणि शिक्षकासमक्ष मनकर्ना गुरलोड हिच्या हस्ते सौ. सुशीला यांना त्यांची सोन्याची वस्तु परत करण्यात आली. त्याबद्दल कु. मनकर्ण हिचे मुख्याध्यापक शिवाजी मनुरे, शिक्षक सतीश कोटगिरे, गोविंद येळगे, श्याम दरबस्तेवार, आनंद पाटील, शंकर उषापोड आणि सय्यद जे आय, माधव पडोळे, जयराम कल्याणकार, अशोक इलतेफोड, नागोराव येवतीकर, अशोक चिंचलोड, गणेश इबितवार, संतोष पेंडकर आणि तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी. एस. मठपती आदिंनी कौतूक करून अभिनंदन केले आहे

No comments:
Post a Comment