Sunday, 15 July 2018

काव्यप्रेमी

"काव्यप्रेमी शिक्षक मंच®"

शनिवार दिनांक  : १४/०७/२०१८ रोजी होणाऱ्या  ऑनलाईन साहित्यिक भेट अर्थात, ऑनलाईन प्रकट मुलाखत या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आपल्याशी हितगुज साधण्यास,मार्गदर्शन करण्यास,त्यांचे साहित्यिक म्हणून विविध अनुभव शेयर करण्यास;ज्यांची आतापर्यंत पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत; जे विविध माध्यमातून वैचारिक लेख लिहिण्याची आवड आहे; ज्यांचे आजपर्यंत जीवन शिक्षण मासिकातून ही लेख प्रसिद्ध झाले आहेत; ज्यांनी दै.लोकपत्रमध्ये दर सोमवारी ऑफ पिरियड सदरा मध्ये एक वर्ष स्तंभलेखन केले आहे; मुलांसाठी ज्यांनी दै. देशोन्नती मध्ये फनक्लब पेजवर मनोरंजक शब्दकोडी,लेख लिहिले आहेत; गेल्या दोन वर्षापासून जे समाज माध्यमाच्या अशा विविध समूहाद्वारे रोज सकाळी फ्रेश मॉर्निंग बुलेटिन या परिपाठात उपयुक्त पोस्टची निर्मिती करतात;जे त्यातील बातम्यांचे स्वतः निवेदन करतात;तसेच ज्यांचे संवेदना मी एक शिक्षक जागृती हे वैचारिक लेख असलेले ई बुक, हरवलेले डोळे हा ई कथासंग्रह प्रकाशित केलेला आहे;  ज्यांना विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यात भाग घेणे,इत्यादीची आवड आहे;ज्यांना आज पर्यंत मानाची अनेक पदे,अनेक नामांकित  पुरस्कार,सन्मानचिन्ह प्राप्त आहेत;असे उपक्रमशील, नामांकित,सुप्रसिद्ध सन्माननीय अतिथी मा.श्री नागोराव सा. येवतीकर ऊर्फ नासा सरजी आपला  बहुमूल्य वेळ देऊन आपल्या समूहात रात्री ठीक ९:००ते १०:३० या वेळेत ऑनलाईन  उपस्थित राहणार आहेत!!तेव्हा बहुसंख्य मान्यवर समूह  सदस्यांनी या  मुलाखतीचा आवर्जून लाभ घेण्यास,अतिथींशी हितगुज करण्यास ,त्यांच्याशी सुसंवाद साधण्यास समूहात रात्री ठीक ९:००ते १०:३० या वेळेत  ऑनलाईन  उपस्थित राहावे!!
                  ही विनंती!!!
                   
समूह प्रशासक -श्री आनंद घोडके
संयोजक- श्री रामदास देशमुख

सन्माननीय मुलाखत अतिथींचा
अल्प-परिचय

नाव: श्री नागोराव सा. येवतीकर

टोपणनाव: नासा

व्यवसाय: नोकरी- प्राथमिक शिक्षक 

कार्यरत शाळा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिरली
ता. बिलोली जि. नांदेड 

पत्ता:  मु. येवती पोस्ट. येताळा ता. धर्माबाद जि. नांदेड

संपर्क: ९४२३६२५७६९

ई-मेल:- nagorao26@gmail.com

ब्लॉग: address - http://nasayeotikar.blogspot.com

जन्मतारीख: २६ एप्रिल १९७६

छंद: शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड त्यामुळे विविध वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिकात वैचारिक लेख लिहिण्याचा छंद आहे. जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी लेख प्रकाशित झाले आहेत. दैनिक लोकपत्रमध्ये दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली एक वर्ष स्तंभलेखन केले आहेत, ज्यात शैक्षणिक विषयी विचार मांडले आहेत.लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहितो,तसेच मी मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढावी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतो,जे की दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेजवर प्रकाशित झाले आहेत.  यापूर्वी याच ई साहित्याच्या मदतीने 'संवेदना', 'मी एक शिक्षक', 'जागृती' हे वैचारिक लेख असलेले ई बुक आणि 'हरवलेले डोळे' हा ई कथासंग्रह प्रकाशित करण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांना सतत कामात व्यस्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम तयार करतो आणि त्यां उपक्रमाच्या माध्यमातून शिकविण्याचा माझा  प्रयत्न असतो.
गेल्या दोन वर्षांपासून रोज सकाळी फ्रेश मॉर्निंग बुलेटिनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शालेय परिपाठासाठी उपयुक्त अशी पोस्ट करतो.आणि स्वतः बातम्यांचे निवेदन करतो. यापूर्वी माझी  पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

   धन्यवाद

आज शनिवारीय उपक्रमात,आपल्या काव्यप्रेमी मंचावर रात्री ठीक ९ते१०:३०या वेळेत सन्माननीय अतिथींची ऑनलाईन मुलाखत आयोजित केलेली असल्या कारणाने उपरोक्त वेळेत कुण्याही मान्यवर व्यक्तीने गैर-मुलाखत पोस्ट टाकू नये!
   

विजया पाटील - नमस्कार दा.....आपण कधीपासून लिखाणाकडे वळलात??
नासा येवतीकर : मी माध्यमिक शाळेत असतांना मराठी विषयात निबंध लिहा असा प्रश्न असायचा त्या प्रश्नाचे उत्तर मी सविस्तर लिहीत असे. माझे शिक्षक मला पेपर वाचण्यास सांगायचे त्यावेळी माझी नजर वाचकांची पत्र यावर पडली. मी ठरविले की, लिहायचे. पहिला लेख दहाव्या वर्गात असताना सन1993 मध्ये प्रकाशित झाला.

रामदास देशमुख : आपल्याला काही साहित्यिक दृष्टीने पार्श्वभूमी लाभली का?
नासा : माझ्या घरात तसे कोणी ही साहित्यिक नव्हते. मात्र माझ्या घरात चांदोबा, किशोर सारखे पुस्तक दरमहा पोस्टाने येत कारण वडील शिक्षक होते. वाचनाची गोडी लागली. हळूहळू मग लेखनाची वाचन केल्याशिवाय अनुभव मिळत नाही म्हणून वाचाल तर लिहाल

‪विजया पाटील ‬: निवेदन ही एक कला आहे. त्याचे विशेष शिक्षण घेतले आहे काय?
नासा : निवेदन करण्याची विशेष असे शिक्षण कोठे ही घेतलं नाही. मात्र रेडिओ लहानपणापासून ऐकत आलोय. माझी सकाळ रेडियोच्या धूनने व्हायची. सकाळी उठल्यापासून सायंकाळी झोपी जाईपर्यंत रेडियो सोबत असायचा. रेडिओवर आवडता भाग महा जे क्रिकेटचे समालोचन ऐकणे. ऐकूण ऐकून समालोचन करण्याची सवय लागली. तीच सवय मला निवेदन मध्ये मदत केली. मनिंदर सिंग यांच्या आवाजात घरी समालोचन केल्याने मला शाबासकी मिळाली हे मला आज ही आठवते.

पंडीत रामहरी ‬: सरजी
ई कथा बुक बद्दल सांगा...मला काढायचा असेल तर काही अनुभव शेअर करावा.
नासा: ई बुक म्हणजे स्वस्तात आपली प्रकाशन क्रिया पूर्ण करणे. आपण यासाठी
esahity@gmail.com वर mail करून संपर्क करावे पूर्ण माहिती मिळून जाईल.

रामदास देशमुख: आपल्या मोबाईल वर कॉल केला असता,...है प्रीत जहा की रीत सदा.... ही डायलर टोन ऐकली,त्या अनुषंगाने... लेखकाने राष्ट्रीयत्व जोपासावे की प्रांतीयत्व?
नासा : अर्थात देश पहिल्यांदा

‪विजया पाटील ‬: आपली कोणकोणती पुस्तके प्रकाशीत झाली आहेत?
नासा : पाऊलवाट जे की पुस्तक रुपात प्रिंट काढलेली पहिली पुस्तक. संवेदना, मी एक शिक्षक, जागृती, शाळा आणि शिक्षक हे सर्व ई बुक वैचारिक पातळीचे तर हरवलेले डोळे हा ई कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. बालसंस्काराच्या गोष्टी - प्रगतीपथावर आहे

विजया पाटील ‬: मार्निंग बुलेटिन या सदरासाठी विशेष कुणाची प्रेरणा मिळाली?
नासा : आमचा मित्राचा एक समूह आहे. ज्यात नेहमी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होते. त्यात एके दिवशी मित्रांनी शाळेत बातम्या वेळेवर मिळत नाही, त्यासाठी काही करता येईल काय ? असा प्रश्न टाकला. तेंव्हा माझा पत्रकार मित्र कुणाल पवारे यांनी बातम्या देण्याची सहमती दर्शविली. मग एकाने सुविचार, दिनविशेष, बोधकथा असे करत ही फ्रेश मॉर्निंग बुलेटीन सेवा 15 ऑगस्ट 2015 रोजी सुरू करण्यात आली. जे की आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्वदूर पोस्ट होते.

रामदास देशमुख: साहित्यिक चळवळी रुजवण्यासाठी व्हाट्स अँप सारखी समाज माध्यमे खऱ्या अर्थाने कार्य करतील का?
नासा : छान प्रश्न विचारलात सर, आमचा साहित्य स्पंदन नावाचा समूह आहे. या समूहतील काही सदस्य त्यात सहभागी आहेत. आम्ही नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळावी म्हणून सप्ताहात विविध स्पर्धा आयोजित करीत होतो. जयतून अनेककनी लेखन केले आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर होय असे देतो.

खुशाल गुलहाने ‬: मा.सरजी,पुस्तक वाचनाचा जसा लेखनासाठी उपयोग होतो तसा माणसं वाचनाचा होतो का ?
नासा : अशी काही लेखकांची पुस्तके वाचावी लागतील ज्यात माणसांची वागणे मंडली आहेत. विशेष करून पुल ची पुस्तकं वाचावीत म्हणजे माणसं कळायला लागतील.

पंडीत रामहरी ‬: सरजी,
किशोर मासिकाच्या लेखन कार्यशाळेविषयी माहिती असेल तर कळवा..
भाग घ्यायचा आहे....
नासा : किशोर मासिकाच्या कार्य शाळे विषयी तेवढी माहिती मला नाही.

‪मीना सोसे ‬: निवेदनासाठी ठराविक मजकूर पाठांतर करावे लागते का
नासा : काही वेळा आठवणी वर देखील निवेदन द्यावे लागते. बहुतांश वेळा लिखित स्वरूपात असलेले निवेदन देण्याची वेळ येते.

वर्षा भोज : फ्रेश मॉर्निंग बुलेटीन हा सर्वात सुंदर उपक्रम आहे . सकाळी ७ वा आम्ही सर्व वाट पहात असतो
नासा : धन्यवाद

‪विजया पाटील : दा.. आपल्या शाळेतील विद्यार्थी आपल्या लिखाणाचं वाचन करतात काय? त्यांच्या प्रतिक्रिया काय असतात?
नासा: पूर्वी ज्यावेळी पाऊलवाट प्रकाशित झाला होता त्यावेळी माध्यमिक शाळेवर वर्ग सहावी ला शिकवीत होतो. रोज एक प्रकरण अभिवचन करून घेतल होतं. मुलांनी आनंद व्यक्त केलं. आज ही मला ते फोन करतात. लेख वाचल्यावर

‪मीना सोसे ‬: व्हाॅटस अप फेसबुक मुळे पुस्तक वाचन सगळ्यांचे कमी झाले आहे असे वाटते का
नासा : पुस्तक वाचणारे आज ही वाचन करत आहेत. मात्र जे कधी पुस्तक उघडून पाहत नव्हते ते मात्र या सोशल मीडियामुळे वाचायला लागली असे वाटते.

रामदास देशमुख : समीक्षण,रसग्रहण, परीक्षण यातील भेद आपल्या दृष्टीने कसा स्पष्ट कराल?
नासा : माझ्यासाठी जरा कठीण प्रश्न आहे. राखीव ठेवतो.

मीना सोसे ‬: साहित्यिकांनी स्वतः स काय शिस्त लावावी जेणे करून लिखाण सकस होईल
नासा : साहित्यिकांनी दुसऱ्यांचे साहित्य मन लावून वाचावे. इतरांच्या साहित्याची कॉपी करण्यापेक्षा त्या साहित्याचा आणि माझ्या अनुभवाचा सांगड घालून स्वतः चा एक उत्तम लेख तयार करावा. वाचन एक दिशा मिळावी म्हणून करावे. डोक्यात आलेली कल्पना लगेच कागदावर उतरवून काढावी. रफ लिहा पुन्हा फेर करा, पुन्हा वाचा, मित्रांना वाचण्यास द्या. शेवटी अंतिम करा

‪खुशाल गुलहाने : चांदोबा, किशोर इ.नी तुमच्यावर निश्चित  चांगले संस्कार केले असणार.त्याचा पुढील आयुष्यात आपल्याला कसा उपयोग झाला ? विद्यार्थ्यांना त्याचा आपण कसा फायदा करून दिला.
नासा : यामुळे मला कथा वाचनाचा छंद लागला. कात्रण करणे, कविता वाचणे, चित्र पाहणे यामुळे माझे डोळे सक्षम झाले. वाचनाची गती वाढली. आज मी शाळेतील मुलांना वाचन कसे करावे ? काय करावे हेच सांगत असतो. माझी मुलं त्या पद्धतीने वाचताना पाहून आनंद वाटतो.

रामदास देशमुख : आजकाल समाज माध्यमांवर साहित्यिक ग्रुपचे खूपच पेव फुटले, काय भाष्य कराल?
नासा : प्रत्येकांना वाटत असते की, आपली एक कंपनी असावी. आपल्या समूहात आपले मित्र असावेत. काही का असेना पण गेल्या तीन वर्षात खूप काही नावनिर्मिती झाली. त्याचसोबत चोर ही तयार झाले, हे ही विसरून चालणार नाही.

आनंद घोडके : व्हाटसप् मुळे नाते संबंधातील नाजूकता नष्ट होत आहे...यावर काही असे उपाय सांगता येईल की ज्यामुळे नवं युग आणि जुन्या युगातील तफावत कमी होईल?
नासा : खूप गंभीर प्रश्न आहे. यामुळे माणसांनी सर्वप्रथम आपले वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे. कोणाला किती वेळ द्यायचा हे जे ठरवितात त्यांना त्रास होत नाही. सदानकदा मोबाईल हातात हे खूप वाईट आहे. यंपासून वाचले पाहिजे आणि कुटुंबाला वेळ दिला पाहिजे

‪खुशाल गुलहाने ‬: या गोष्टी सोशल मिडियामुळे कमी झाल्या.थोडक्यात  कागदावरचे लेखनच कमी झाले .ही बाब चांगली की वाईट ?
नासा : अर्थात कागदावरच लेखन कधीही चांगले ज्यामुळे हात, डोळे आणि मेंदू यांचा समन्वय होतो. उलट मोबाईल वर डोळे दुखतात आणि त्यांचे अक्षर दिसत नाही.

‪गणेश कुलकर्णी ‬: सरजी लेखनात व्याकरण किती महत्वाचे ते सांगावे
नासा : व्याकरण अर्थात खूप महत्वाचे आहे. तुमचे विचार खूप छान आहेत ।तर लेखनात असंख्य चूका असतील तर पुढचा जाणकार असेल तर थोडा नाराज होतो. म्हणून शक्यतो आपले साहित्य व्याकरणदृष्ट्या अचूक असायलाच हवी

विजया पाटील : मग चोरांच्या बंदोबस्त करण्यासाठी ठोस अशी काही उपाययोजना सुचवाल काय?
नासा : आपले साहित्य सोशल मीडिया वर पोस्ट करण्यापूर्वी, वृत्तपत्रात प्रकाशित करणे, स्वतः च्या ब्लॉग वर प्रकाशित करणे. तसेच पोस्ट च्या खाली copy न करण्याची सुचना देणे

खाजभाई बागवान ‬: नासा सर नमस्कार माझा आवडता प्रश्न ही मुलाखत देताना कसं वाटत म्हणजे आपल्या आता कसे feel होत आहे?
नासा: खूप छान

‪गणेश कुलकर्णी ‬: बरोबर आहे सर कागदावरिल लेखन अतुट असे असते.
नासा : होय

रामदास देशमुख : जे केवळ मोबाईल वरच बोटाने टायपुन लिहितात,अशा मंडळींना काय सल्ला द्याल?
नासा : ज्यात मी पण आलोय, रोज वहीवर एक पान लेखन करत राहावे

‪खाजभाई बागवान ‬: सर अजून एक प्रश्न आपले नासा हे टोपण नाव कोणी दिले आपणास
नासा : मी नववी वर्गात असतांना शाळेत एका शिक्षकांनी NASA चा Full Form विचारले होते. आणि त्यांनी त्याचे उच्चार देखील केले. माझ्या जवळ बसलेला माझं जिवलग मित्र हळूच सर ला ऐकू जाणार नाही अश्या आवाजात म्हटलं नागोराव सायना झालं त्यादिवशी पासून माझं नाव नासा झालं

रामदास देशमुख: आपण कवितेकडे कधी वळला नाहीत का?का?
(साहित्यातील कविता हं)
नासा : कविता करणे हा माझा कधी ही पिंड नव्हता आणि नाही. पण या सोशल ने ते मला शिकविले.

खुशाल गुलहाने ‬: इतरांनी आपले म्हणजे साहित्यिकाचे साहित्य वाचावे म्हणूून साहित्यिकांनी काय करायला हवे असे आपणास वाटते ?
नासा : स्वतः चा एक ब्लॉग तयार करावे. तेथे सर्व साहित्य पोस्ट करून ठेवावे. मित्रांना share करावे. जमेल।त्यावेळी वाचण्याचा विनंती करावी. नियमित वृत्तपत्रात प्रसिद्धी द्यावी.

‪गणेश कुलकर्णी ‬: आपला कोणता ई बुक संग्रह
प्रकाशीत आहे ?

रामदास देशमुख : गझल साधना,उपासना यावर काय सांगाल?
नासा : प्रयत्नाने हे साध्य होऊ शकते हे आमच्या समूहात बहुतेक जनांचे अनुभव पाहुन संगतो आहे. मला त्यात रस निर्माण झाले नाही.

खाजभाई बागवान : आज काल ऑनलाईनच्या जमान्यात कव्यसंग्रहाना साहित्याला हवी तेवढी प्रसिद्धी मिळत नाही तर खर आणि चांगल्या कव्यसंग्रहाना प्रसिद्धी मिळावी यासाठी काय करावे आपले मत सांगा
नासा : प्रत्येकांना स्वतः चे साहित्य छान आहे असे वाटते. त्यात गैर नाही. मात्र त्यासाठी मित्रमित्रांनी मिळून छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून लोकांपर्यंत पोहोचता येते. सर्वांचे साहित्य चांगलेच असते कारण ते नवनिर्मित असते.

रामदास देशमुख : आपण मंचा चे नांदेड जिल्हा अध्यक्ष म्हणून मंच साहित्ययिक दृष्टीने प्रगती पथावर नेण्यास काही योजना आहेत का?असतील तर कोणत्या?
नासा : काव्यप्रेमी मंच हे समुहाचे नाव मी गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहे. असे वाटते . सोलापूर ला एक काव्यवाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते घोडके सर यांनी पण मला यायला जमले नाही. आठवते थोडं. मात्र कामाचा व्याप आणि असंख्य ग्रुप यामुळे पूर्ण चिंध्या चिंध्या होत आहे. नक्कीच आपल्या मंचासाठी अनेक योजना तयार होतील. त्यास प्रगती पथावर देखील नेता येईल. आज आत्ता मी काही योजना सांगू शकत नाही. मात्र थोड्याच दिवसात नक्की

पंडीत रामहरी ‬: सरजी
गझल काव्यप्रकार हाताळता का?
याबाबत काय भाष्य कराल?
नासा : नाही सर

रामदास देशमुख : समाज माध्यम द्वारे एक आभासी जग निर्माण होत आहे,त्याचे अनेक बळी जात आहेत,साहित्यिक म्हणून काय सांगाल?
नासा : जेथून जे चांगले मिळते ते घ्यावे, बाकी सर्व आहे तिथे सोडून द्यावे. येथील पोस्ट वर जास्त खोलात विचार न करता सो सो विचार करावे. चुकीची कोणतीही बाब आपण स्वतः share करू नये. मित्रांसोबत किंवा कुटुंबातल्या व्यक्तीसोबत रोज एक तास मोबाईल बाजूला ठेवून घालवावे

पंडीत रामहरी : सरजी,
आज समाज व साहित्य यात *दरी* आहे का? साहित्याचे *समाजशास्त्रिय मूल्यमापन* आपण कसे कराल?
नासा : दरी आहे असे वाटते. कारण आज जे साहित्य येत आहे त्यात वेदना किंवा जाणिवा फार कमी प्रमाणात दिसून येतात. वरवरचे साहित्य बाहेर पडत आहे. कुठे तरी एखादा साहित्यिक पोटातून लिहीत आहे. समाजाच्या विकासासाठी किंवा प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी ज्यांचे लेखन होते ते लगेच सर्वदूर प्रसिद्ध होते. समाजाचे चित्र साहित्यिकांनी मांडायला हवे

रामदास देशमुख : देशोन्नती मधील स्तंभलेखन बाबतीत अनुभव काय सांगाल?
नासा : माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंटचा प्रश्न आहे. दैनिक देशोन्नती ने मला महाराष्ट्रात पोहोचविले आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. संपादक मा. प्रकाशजी पोहरे यांचे नेहमी ऋणात असेन. त्यावेळी हे मोबाईल नव्हते. मी रात्री दोन तास कागदावर लिहायचो आणि सकाळी पोस्टात टाकायची. बरोबर आठ दिवसांनी ते लेख प्रकाशित व्हायचे. अनेक वाचक पत्राद्वारे उत्तर द्यायची. मला हुरूप यायचा. असे करत लिहीत गेलो. देशोन्नती ने मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली

रामदास देशमुख : सरजी ,आपण मंचा वर जास्त दिसत नाही त काही व्यस्तत्ता की आणखी काही...काय सांगाल?
नासा : सकाळची वेळ फ्रेश बुलेटीन साठी राखीव असते आणि सायंकाळी whatsapp पाहतो. पण पूर्वी म्हटल्याप्रमाणे अनेक ग्रुप अनेक पोस्ट मी काहीच वाचत नाही.

रामदास देशमुख : आपल्या लेख लेखनासाठी कुणी आदर्श डोळ्यासमोर ठेवून आहात काय?
नासा : माझे वडील बंधू माझ्यासमोर नेहमी एक आदर्श आहेत. ज्यांच्यामुळे मी घडलो

पंडित रामहरी ‬: सरजी,
आपणास साहित्याचा कोणता प्रकार लिहायला व वाचायला आवडतो?
नासा : अर्थातच वैचारिक आणि प्रेरणात्मक करणारे

रामदास देशमुख : आपल्या या मंचा ला ही वेळ देण्यासाठी काही वेळ राखून ठेवाल का?
नासा : नक्की आपल्या मंचा साठी यापुढे माझी शनिवारची दुपार नक्की राहील. रोज वेळ देणे खूप अशक्य आहे.
स्वतः ची 15 ग्रुप आहेत. जिथे सातत्याने काही तरी करावे लागते. त्यामुळे शनिवार

श्याम स्वामी -
नासा : अर्थातच मध्यस्थाची भूमिका घ्यावी लागते. आपण सर्व एकत्र आलोत म्हटल्यावर तो प्रश्न आपणच सोडवायला हवे.

‪पंडीत रामहरी ‬: सरजी
वैचारिक लेखनाचे आपल्या मते
निकष कोणते आहेत?
नासा : वैचारिक लेखांचे निकष असे ठराविक काही सांगता येणार नाहीत. मात्र ज्यातून आपण समाजाला एक नवी विचार प्रेरणा देत असू तर ती वैचारिक ठरेल. एखादी नवी कल्पना व्यक्त करत असाल तर ती वैचारिक कल्पकता होऊ शकते. आपली विचारधारा ही हजार लोकांची आहे असे समजून लिहिणे

रामदास देशमुख : एकंदरीत नवोदित,प्रस्थापित, विस्थापित सर्वांना जाता जाता काय सल्ला द्याल?
नासा : भरपूर वाचन करू या आणि लिहिते लिहिते लिहिते होऊ या

रामदास देशमुख

शनिवार   दिनांक   : १४/०७/२०१८ रोजी झालेल्या ऑनलाईन साहित्यिक भेट अर्थात, ऑनलाईन प्रकट मुलाखत या आगळ्या वेगळ्या उपक्रमात आपल्याशी हितगुज साधण्यास,मार्गदर्शन करण्यास,त्यांचे साहित्यिक म्हणून विविध अनुभव शेयर करण्यास मंचा वर अतिथी म्हणून आलेले  उपक्रमशील,नामांकित,सुप्रसिद्ध सन्माननीय अतिथी मा.श्री नागोराव येवतीकर उर्फ नासा सरजी आपला  बहुमूल्य वेळ देऊन आपल्या समूहात रात्री ठीक ९:००ते १०:४० या वेळेत ऑनलाईन  उपस्थित राहले!त्यांचे संयोजक नात्याने औपचारिक मनःपूर्वक आभार!!
               तथापि,मुलाखत संयोजन समिती तथा सर्व काव्यप्रेमी मंच त्यांच्या  कायम ऋणात असेल!
            तसेच बहुसंख्य मान्यवर समूह  सदस्यांनी या  मुलाखतीचा आवर्जून लाभ घेतला,अतिथींशी हितगुज केले,त्यांच्याशी सुसंवाद साधला त्यांचे तसेच काही मान्यवर मुलाखत उपक्रमात अप्रत्यक्ष सहभागी झाले त्यांचे ही मनस्वी आभार!!
          सन्माननीय अतिथी श्री नासा सरजी यांना पुढील सर्व प्रकारच्या ज्ञात अज्ञात कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करुया!
       आणि याच आगळ्यावेगळ्या शनिवारीय उपक्रमात लवकरच नव्या अतिथींशी नव्या उत्साहाने एक सप्ताह नंतर येथेच भेटूयात; तेव्हा कुठेही जाऊ नका,अनुभवत रहा, घेत रहा,देत रहा आनंद आणि आनंदच!

    मुलाखत समाप्त

समूह प्रशासक -श्री आनंद घोडके

संयोजक- श्री रामदास देशमुख

‪+91 97650 11251‬: सरजी,
शालेय विद्यार्थ्यात
वैचारिकता, साहित्यिक कौशल्य, इ. गुणांचं संक्रमण कसं करता?
किंवा सफल विद्यार्थ्यांने नंतरच्या भेटीत व्यक्त केलेली *क्रूतज्ञेची भावना* या क्षणी आपल्याला कसा अनुभव येतो..

No comments:

Post a Comment