Sunday, 15 July 2018

बुलेटीन दिनांक 16 जुलै

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 16/07/2018 वार - सोमवार
=========ஜ۩۞۩ஜ=========
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
*जागतिक सर्प दिवस*

💥 ठळक घडामोडी :- 
६२२: प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.
१६६१: स्वीडिश बँकेने युरोपमधील पहिल्या नोटा जारी केल्या.
१९३५: ओक्लाहोमा मध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले.
१९४५: अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी.
१९६५: ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.
१९६९: चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.
१९९२: भारताचे ९वे राष्ट्रपती म्हणून डॉ. शंकरदयाळ शर्मा यांची निवड झाली.
१९९८: गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय.

💥 जन्म :-
१९०९: स्वातंत्र्यसेनानी. भारतरत्न (मरणोत्तर) अरुणा आसीफ अली
१९१३: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती
१९१४: मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे
१९१७: नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथूर
१९२३: भूदल प्रमुख के. व्ही. कृष्णराव
१९२६: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इर्विन रोझ
१९३९: भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज
१९४३: लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे
१९६८: भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले
१९६८: विकिपीडिया चे सहसंस्थापक लैरी सेन्जर
१९७३: दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेटपटू शॉन पोलॉक
१९८४: हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ

💥 मृत्यू :- 
१९८६: इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वा. सी. बेन्द्रे
१९९३: रामपूर साहसवान घराण्याचे ख्यालगायक उ. निसार हुसेन खाँ 
१९९४: नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
1⃣ *तिरुपती बालाजी मंदिराचा मोठा निर्णय; भक्तांना दर्शनासाठी नो एंट्री, पहिल्यांदाच मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, 11 ते 17 ऑगस्ट या सहा दिवसांत भाविकांना घेता येणार नाही दर्शन*
-----------------------------------------------------
2⃣ *चेन्नई : केंद्र सरकारच्या 'एक भारत, एक निवडणूक'च्या प्रस्तावाला तमिळनाडू राज्यातून विरोध केला जात असला तरी मात्र, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी प्रस्तावाला दर्शवला पाठिंबा*
-----------------------------------------------------
3⃣ *लांबपल्ल्याच्या गाड्यांमधून एसीचा प्रवास करणाऱ्यासांठी एक वाईट बातमी, लवकरच एसीचा प्रवास महागण्याची शक्यता*
-----------------------------------------------------
4⃣ *उद्योगपती मुकेश अंबानी बनले आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती*
-----------------------------------------------------
5⃣ *फिफा फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स ठरला जगज्जेता, क्रोएशियाचा ४-२ ने केला पराभव* -----------------------------------------------------
6⃣ *थायलंड ओपन विश्व टूर सुपर ५०० टूर्नामेंटच्या महिला एकेरीच्या फायनलमध्ये पी. व्ही. सिंधूला करावा लागला पराभवाचा सामना*
-----------------------------------------------------
7⃣ *Wimbledon येथील सेंटर कोर्टवर रंगलेल्या विम्बल्डन पुरूष एकेरी स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने अंतिम लढतीत दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसनवर   6-2, 6-2, 7-6 ( 7-3) असा सहज विजय मिळवित 13 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावले*
-----------------------------------------------------
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
=========ஜ۩۞۩ஜ=========
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
=========ஜ۩۞۩ஜ=========

*शिक्षणाचा काय फायदा ?* 

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

http://nasayeotikar.blogspot.com/2018/05/blog-post_67.html

आपले अभिप्राय जरूर द्यावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
=========ஜ۩۞۩ஜ=========
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
=========ஜ۩۞۩ஜ=========
          *अरुणा असफ अली*

अरुणा असफ अली यांचा जन्म १६ जुलै१९०८ साली झाला. मूळच्या त्या अरुणा गांगुली. इ.स. १९४२ सालच्या चले जाव मोहिमेत गांधीजीनी राष्ट्रास "करो वा मरो" चे आव्हान केले. त्या वर्षी ८ ऑगस्ट रोजी मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भरलेल्या सभेत अरुणा असफ अलींनी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता. यासाठी त्यांची खास आठवण ठेवली जाते.
अरुणा असफ अली यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यासाठी १९९७ मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

*संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ*
📱09403407550
=========ஜ۩۞۩ஜ=========
       🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
=========ஜ۩۞۩ஜ=========

         खिशातल्या हजार रुपयांची किंमत
सुद्धा लहानपणी आईने गोळ्या खाण्यासाठी दिलेल्या एक रुपयापेक्षा कमीच असते..

*संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*
 📱  9850296824
=========ஜ۩۞۩ஜ=========
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
=========ஜ۩۞۩ஜ=========

*१) 'ब्रोकन विंग' कादंबरी कुणी लिहिली आहे ?*
        खलिल जिब्रान

*२) सध्याचे लष्करप्रमुख कोण आहेत ?*
        ज. बिपिन रावत

*३) जागतिक रेडक्रॉस दिवस कधी साजरा केला जातो ?*
       ०८ मे

*४) जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार अधिकारी कोण होता ?*
      जनरल डायर

*५) 'अप्पर कट' ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?*
        बॉक्सिंग

*संकलन : संगीता देशमुख, वसमत*
📱 9975704311
=========ஜ۩۞۩ஜ=========
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
=========ஜ۩۞۩ஜ=========

* जयवंत हंगरगे, सहशिक्षक, धर्माबाद
* संगीता संगेवार, धर्माबाद
* कपिल भाऊ
* मारोती गाडेकर
* सुरेश भाग्यवंत

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
=========ஜ۩۞۩ஜ=========
     *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* 
=========ஜ۩۞۩ஜ=========
     *"रूची "*

न आवडणाराला वाटते 
हे काही धड नाही 
साखर खाऊ घातली 
तरी वाटते गोड नाही

रूची असल्या शिवाय 
निर्माण होत नाही आवड 
रूचीहीन कशाला कोण 
काढील सांगा बरं सवड

   शरद ठाकर 
सेलू जि परभणी 
8275336675

=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟
=========ஜ۩۞۩ஜ=========

*'नकार' साधा नसतो. त्याची एक किमंत असते. ती कधी अत्यंत स्वस्त असते तर कधी अत्यंत महाग. रामायण आणि महाभारताने असे अनेक नकार आपल्यासाठी उदाहरणे म्हणून ठेवले आहेत. रामायणात न दिलेले 'नकार' आदर्श निर्माण करतात. तर महाभारतात 'नकार' दु:ख आणि विध्वंस घडवतात.*

*रामाने वनवासात जाण्यास नकार दिला असता तर पितृवचनी राम असा आदर्श राहिला नसता. एका धोब्याच्या टिकेवर रामाने विश्वास ठेवण्यास नकार दिला असता, तर जनहित जपणारा 'राजा' म्हणून रामाचे नाव झाले नसते. या प्रत्येक नकाराने पुढे अनंत यातनांना जन्म दिला, पण शेकडो वर्ष टिकणारे 'आदर्श' जन्माला घातले.*

*महाभारतात पावलोपावली शक्तिशाली नकार दिसतात व सामान्यांना आधार देणारे आदर्श निर्माण करतात. कुंतीचा कर्णाला स्विकारण्यास नकार, दुर्योधनाचा पांडवांना राज्य देण्यास नकार, द्रौपदीचा दुर्योधनास नकार हे सर्व विध्वंसक ठरले.*

*"अर्जुनाने युद्धाला नकार दिला नसता तर 'भगवद्-गीता' जन्माला आली नसती. आम्ही 'गीते'ला मुकलो असतो."*

    ••●🔻‼ *रामकृष्णहरी* ‼🔻●••
     ⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜⚜
        *--संजय नलावडे, मुंबई*
         📱 9167937040
=========ஜ۩۞۩ஜ=========
     *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
=========ஜ۩۞۩ஜ=========

आपण केलेल्या कर्माप्रमाणे
प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही, परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡*
=========ஜ۩۞۩ஜ=========
         *उपकार - Thank You*
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
=========ஜ۩۞۩ஜ=========
               *दुसऱ्यांचे उपकार*

एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्‍याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले. त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही. 
बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला. यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.

*📝   संकलन*  📝
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱  9403046894
=========ஜ۩۞۩ஜ=========
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
=========ஜ۩۞۩ஜ=========
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Friday, 13 July 2018

फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 14 जुलै

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 14/07/2018 वार - शनिवार
=========ஜ۩۞۩ஜ=========
  🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========

💥 ठळक घडामोडी :- 
१७८९: फ्रेंच क्रांतीची सुरवात.
१८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१९५८: इराकमध्ये राजेशाही विरुद्ध उठाव. अब्दुल करीम कासम सत्तेवर.
१९६०: चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. ४५ वर्षे त्यांनी संशोधन केले.
१९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९७६: कॅनडात मृत्युदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
२००३: जागतिक बुद्धिबळ महासंघद्वारा सन्दीप चंदा यांना ग्रँडमास्टर पुरस्कार मिळाला.
२०१३: डाकतार विभागाची १६३ वर्षांपासूनची तार सेवा बंद झाली.

💥 जन्म :-
१८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर
१८६२: ऑस्ट्रियन चित्रकार गुस्टाफ क्लिम्ट
१८८४: महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक यशवंत खुशाल देशपांडे
१८९३: भारतीय कवी आणि लेखक गारिमेला सत्यनारायण
१९१०: टॉम अँड जेरीची चित्रे काढणारे चित्रकार विल्यम हनी
१९१७: संगीतकार राजेश रोशन 
१९२०: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण
१९४७: मॉरिशसचे ३रे व ६वे पंतप्रधान नवीन रामगुलाम 
१९६७: श्रीलंकेचे क्रिकेटपटू हशन तिलकरत्ने

💥 मृत्यू :- 
१९०४: दक्षिण आफ्रिकेचे क्रांतिकारी आणि ५वे राष्ट्राध्यक्ष पॉल क्रुगर
१९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी
१९६३: योगी व आध्यात्मिक गुरू स्वामी शिवानंद सरस्वती 
१९७५: संगीतकार मदनमोहन
१९९३: करवीर संस्थानच्या महाराणी श्रीमंत विजयमाला राणीसाहेब
१९९८: मॅकडॉनल्डचे सहसंस्थापक रिचर्ड मॅकडोनाल्ड
२००३: हिंदी चित्रपट अभिनेत्री लीला चिटणीस 
२००३: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या
२००८: सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
1⃣ *नागपूर : नाणार प्रकल्प लादणार नाही; चर्चा करून निर्णय घेऊ - नाणार बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन*
-----------------------------------------------------
2⃣ *लाहोर : पाकिस्तानचे  माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची कन्या मरियम यांना लाहोर विमानतळावर अटक.*
-----------------------------------------------------
3⃣ *ठाणे - डोंबिवली आणि परिसरात जाणवले 2.8 मॅग्निट्युट तीव्रतेचे भूकंपाचे धक्के*
-----------------------------------------------------
4⃣ *नागपूर - महाराष्ट्र सरकारने 6 व्या वर्गाच्या भूगोलाच्या पुस्तकात केला गुजराती भाषेचा वापर, विरोधकांचा गोंधळ*
-----------------------------------------------------
5⃣ *जळगाव : राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांनी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी.*
-----------------------------------------------------
6⃣ *2022ची फुटबॉल विश्वचषक स्पर्धा 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार*
-----------------------------------------------------
7⃣ *विम्बल्डन 2018 : मॅरेथॉन लढतीत अँडरसनची बाजी, इस्नरला नमवून गाठली अंतिम फेरी*
-----------------------------------------------------
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
=========ஜ۩۞۩ஜ=========
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
=========ஜ۩۞۩ஜ=========

   *शनिवारची दप्तरमुक्त शाळा*

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

https://goo.gl/5seL7t

आपले अभिप्राय जरूर द्यावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
=========ஜ۩۞۩ஜ=========
    🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
=========ஜ۩۞۩ஜ=========

डाॅ. शंकरराव भाऊराव चव्हाण 

डॉ. शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटूंबात पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापिठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. 1945 मध्ये त्यांनी वकिलाची सनद मिळवली. पण रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले आणि शंकररावांच्या कर्तुत्वाचे एक पर्व पूर्ण झाले. 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रूवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रूवारी 1975 रोजी ते महराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजींच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे. मितभाषी व कर्तव्यदक्ष प्रशासक आणि अभ्यासू वृत्ती हे त्यांचे गुणविशेष. २६ फेब्रुवारी २००४ रोजी त्यांचे निधन झाले.

*संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ*
📱09403407550
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
=========ஜ۩۞۩ஜ=========

जीवनात आपले ध्येय कितीही दूरचे असले, तरी त्याच्याकडे जायचे म्हणजे प्रथम एक पाऊल टाकूनच प्रारंभ करावा लागतो व तसेच करीत गेले म्हणजे हळूहळू आपण ध्येयाजवळ पोहोचतो.

*संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*
 📱  9850296824
=========ஜ۩۞۩ஜ=========
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
=========ஜ۩۞۩ஜ=========

*१) रामायण कोणी लिहिलं आहे ?*
          महर्षी वाल्मिकी

*२) पंजाबची राजधानी कोणती ?*
           चंदीगड

*३) 'जायकवाडी धरण' कोणत्या राज्यात आहे ?*
          महाराष्ट्र ( औरंगाबाद )

*४) 'भारुडे कोणाची प्रसिद्ध आहेत ?*
          संत एकनाथ

*५) लीळा चरित्र कोणी लिहिले ?*
       श्री चक्रधर स्वामी

*संकलन : संगीता देशमुख, वसमत*
📱 9975704311
=========ஜ۩۞۩ஜ=========
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
=========ஜ۩۞۩ஜ=========

* मिलींद व्यवहारे, नांदेड
* धनंजय गुम्मलवार, नांदेड
* नितीन काळे 
* भगवान अंजनीकर, नांदेड
* नागेश स्वामी
* आकाश यडपलवार, धर्माबाद
* नंदकिशोर मोरे
* चंद्रकांत वाडगे
* शंकर कंदेवाड
* इरवंत जामनोर

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
=========ஜ۩۞۩ஜ=========
       *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* 
=========ஜ۩۞۩ஜ=========

  "पेरणी "

पेरून ठेवले तेच 
उगवुन येत असते 
चांगले पेरलेले ते 
वाया जात नसते

पेरतांना कधी ही 
पेरून ठेवा चांगले 
चांगले पेरल्यावर 
उगवेल कसे वागले

   शरद ठाकर 
सेलू जि परभणी 
8275336675
=========ஜ۩۞۩ஜ=========
  🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟
=========ஜ۩۞۩ஜ=========

*अनेक वेळा जावा-जावा, भाऊ-भाऊ, सासू-सुना, मित्र-मैत्रिणी अशा मानवी नातेसंबंधात रूसण्यामुळे घरं दुभंगली आहेत. रूसण्याच्या वर्तुळाचा विचार केला तर छोट्या छोट्या गोष्टीत रूसवे-फुगवे होतात. ज्यांच्यात भांडायची ताकद नसते ते रडत बसतात, दु:खी होतात. बिनबुडाची भांडणं असतात. दुस-याचा रूसवा-फुगवा किती ताणायचा यालाही काही मर्यादा असतात.*

*रूसव्यातला फोलपणा कळला तर राग राहात नाही. आपणही निवळत गेले पाहिजे. रूसवे-फुगवे प्रत्येक नात्यात असतात, म्हणून काय संबंध बिघडावयचे का? सहजगत्या रूसवा निघाला तर ठिक नाहीतर प्रत्येकाचे रस्ते वेगवेगळे असतात. आपण चालत राहायचे. अनाथ असलेला मुलगाही 'नारायण सुर्वे' होऊ शकतो.*

*"कुणावाचून कुणाचे अडत नाही.* 
*आपल्या रस्त्याने हसत पुढे निघायचे."*
      
        *--संजय नलावडे, मुंबई*
         📱 9167937040
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
=========ஜ۩۞۩ஜ=========

आपण केलेल्या कर्माप्रमाणे
प्राप्त झालेले फळ हे दैव समजावे, कर्माप्रमाणे जे काही करु त्याची प्रचिती ताबडतोब मिळते त्याला वाट पहावी लागत नाही,परंतु काहीच न करता दैवाप्रमाणे जे काही मिळते ते योगायोगाने मिळाले असे समजावे आणि ते मिळेलच असे ठामपणे सांगता येत नाही.म्हणून दैवापेक्षा आपल्या कर्मावर अधिक विश्वास ठेवायला हवा.

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡*
=========ஜ۩۞۩ஜ=========
          *दैव - Fortune*
=========ஜ۩۞۩ஜ=========
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
=========ஜ۩۞۩ஜ=========

                *मनःशांती*

एकदा संत एकनाथांना कोणी दोन प्रश्न विचारले. एक, त्याच्या स्वत:च्या भविष्याबध्दल, आणि दुसरा, एकनाथ स्वभावाने एवढे शांत आणि निर्द्वेषी कसे राहू शकतात याच्याबद्दल .
एकनाथ हसले; आणि, 'केंव्हातरी याची उत्तरे देईन', म्हणून त्यांनी सांगीतले.
काही दिवसांनी, एकनाथांची त्या गृहस्थाशी भेट झाली. तेंव्हा त्याला बाजूला नेऊन एकनाथ म्हणाले, "तुझ्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर देण्याची वेळ आली आहे, कारण, दुर्दैवाने, तू आता आठ दिवसांच्या आत मरणार आहेस."
तो गृहस्थ सुन्न झाला, गोठला ! एकनाथ समोरून निघून गेले, तेंव्हा तो बधीर मनाने परतला. 
जगलो तर एकनाथांसारख्या संतांच्या सदिच्छेने जगू, अशी त्याला भावना निर्माण झाली.
ती त्याने सार्थ केली. आयुष्यातले आठ दिवस पूर्ण करून नवव्या दिवशी, एकनाथांच्या दर्शनाला तो गेला. एकनाथांना हात जोडून म्हणाला, "तुमच्या कृपेने वाचलो."
एकनाथ मान डोलवित म्हणाले, "आता मी तुम्हाला दुस-या प्रश्नाचे उत्तर देणार आहे. गेले आठ दिवस तुम्ही कसे वागलात ? इतरांच्यावर किती रागावलात?"
तो गृहस्थ उत्साहाने म्हणाला, "कसला हो रागावतो? अगदी छान, शांत आठ दिवस गेले. शांत म्हणजे, मरणाच्या भितीने बेचैन होतो, पण दुस-यावर रागावण्यासाठी ती बेचैनी नव्हती. घरात बायकोशी कधी भांडलो नाही. मुलांना मारले नाही. वाटायचे की, आता अखेरचे आठ दिवस उरले. बायका-मुले पुन्हा दिसणार नाहीत; त्यांना का दुखवावे? अहो, शेजा-याचे जमिनीवरून चार पिढयांचे भांडण होते. त्याला स्वत:च्या हाताने हवा तो तुकडा तोडून दिला. देणे होते ते देऊन टाकले. ज्यांच्याकडून येणे होते, त्यांच्यापैकी जे गरीब होते, त्यांचे येणे सोडून दिले. काही पैसे गमावले, पण शांती कमावली. खूप खूप शांत असे आठ दिवस त्या दृष्टीने गेले."
एकनाथ समोरच्या माणसाच्या पाठीवर हात थोपटून म्हणाले, 
"हे तुझ्या दुस-या प्रश्नाचे उत्तर. आठ दिवसांत जग सोडून जायचे आहे, अशा कल्पनेने मी सदाच वावरतो. म्हणून मी शांत वाटतो." 

*📝   संकलन*  📝
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱  9403046894
=========ஜ۩۞۩ஜ=========
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
=========ஜ۩۞۩ஜ=========
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Wednesday, 11 July 2018

इ २री मराठी गवताचं पातं: http://youtu.be/YI41vdhqiSs

दलितवानी 13 जुलै


 फ्रेश शालेय परिपाठ


संकलक : नासा येवतीकर 9423625769

=========ஜ۩۞۩ஜ=========

दिनांक 13/07/2018 

वार - शुक्रवार

=========ஜ۩۞۩ஜ=========

              फ्रेश दिनविशेष 

ठळक घडामोडी -

१६६०: पावनखिंडीतील लढाई.

१८३७: राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेस मध्ये राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.

१८६३: सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.

१९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

१९२९: जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.

१९५५: २८ वर्षीय रुथ एलिसला प्रियकराचा खून केल्याबद्दल फाशी दिली. ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.

२०११: मुंबई शहरात बॉम्बस्फोटांत २६ जण ठार, तर १३० जण जखमी

जन्म : 

१८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर

१९४२: अमेरिकन अभिनेता हॅरिसन फोर्ड

१९४४: रुबिक क्यूब चे निर्माते एरो रुबिक

१९५३: वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू लॅरी गोम्स

१९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी


मृत्यू : 

१६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिले आपल्या प्राणाचे बलिदान

१७९३: फ्रेंच क्रांतिकारी ज्याँपॉल मरात

१९६९: तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद

१९८०: बोत्स्वानाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सेरेत्से खामा

१९९०: क्रीडा समीक्षक व समालोचक अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान

१९९४: धृपद गायक, संगीतकार शिक्षक पं.के. जी. गिंडे

२०००: साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका इंदिरा संत 

२००९: हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले

२०१०: सुप्रसिद्ध सॅक्सोफोन वादक मनोहारी सिंग


संकलक :- संतोष रहांगडाले, गोंदिया

9404277298

=========ஜ۩۞۩ஜ=========

               फ्रेश माहिती

      *बाजीप्रभू देशपांडे*


बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धे होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजीराजे विशाळगडापर्यंत पोचेपर्यंत शत्रुसैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशपांडे होते. बाजीप्रभू हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते. परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आपलेसे करून घेतले. बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली. बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामिनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे असे होते.


संकलन :- राजेंद्र महाजन, औरंगाबाद

09403407550

=========ஜ۩۞۩ஜ=========

           " फ्रेश सुविचार "


केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.


संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड

 9850296824

=========ஜ۩۞۩ஜ=========

               फ्रेश प्रश्नमंजुषा

*१) भारतीय लष्करातील सर्वात जुनी रेजिमेंट कोणती ?*

         मद्रास रेजिमेंट


*२) ख्रिस्तीयानो रोनाल्डो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*

         पोर्तुगाल


*३) देशातील पहिलं पोलीस म्युझियम कुठे उभारलं जाणार आहे ?*

          नवी दिल्ली

संकलन : नासा येवतीकर, धर्माबाद

9423625769

=========ஜ۩۞۩ஜ=========

                 फ्रेश वाढदिवस


 * सुनील जवंजाळ


* रवी येलमोड


* शेख अहमद


* श्रीनिवास मोरे


* गणेश पांडे


सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

=========ஜ۩۞۩ஜ=========

               फ्रेश विचारवेध......


मनुष्य जीवन जगण्यासाठी काही ना काहीतरी धडपड करत असतो. त्या धडपड करण्यातून त्याला आपल्या जीवनासाठी काहीतरी साध्य करायचे असते. धडपड करणे हा मानवी स्वभाव आहे.

जीवनात चांगले साध्य करण्यासाठी अंत:करणातून आपले चांगले हित साध्य करत करत दुस-याला दु:ख होणार नाही याचे देखील भान असू द्यावे. तरच आपल्या धडपड करण्याचा फायदा होईल. अन्यथा आपली केलेली धडपड वाया जाण्याची दाट शक्यता असते.


व्यंकटेश काटकर,नांदेड.

  संवाद..९४२१८३९५९०/

            ८०८७९१७०६३.

=========ஜ۩۞۩ஜ=========

         फ्रेश मराठी - इंग्रजी शब्द

=========ஜ۩۞۩ஜ=========

   *श्रद्धा - Reverence*

संकलन - कुणाल पवारे, कुंडलवाडी

9960358300

=========ஜ۩۞۩ஜ=========

              फ्रेश बोधकथा

        *एक छोटीशी संधी*


एकदा एका मंदिराच्या पुजाऱ्याच्या गावात पूर येतो. लोक गाव सोडून जायला सुरुवात करतात. जेव्हा ते त्याला आपल्याबरोबर यायला सांगतात तेव्हा तो नाकारतो. तो त्यांना सांगतो, कि त्याचा त्याच्या देवावर विश्वास आहे आणि देव त्याचं नक्की रक्षण करेल. पाणी वाढतं आणि अख्खा गाव त्यात वाहून जातो. एक पट्टीचा पोहोणारा माणूस पुजार्याच्या घरा जवळून पोहत जात असतो. तो पुजार्याला पाठीवरून वाहून न्यायची तयारी दाखवतो; पण पुजारी ते नाकारतो. थोड्या वेळाने एक होडी येते; पण तो त्यातही बसत नाही. शेवटी एक हेलिकाॕप्टर येत आणि त्याच्याकडे शिडी टाकत पण तो तेही नाकारतो. शेवटी पुराचं पाणी वाढतं आणि त्याचं घर बुडतं व तो मरतो. 

तो पुण्यवान गृहस्थ असल्यामुले सरळ स्वर्गात जातो. देव भेटल्या भेटल्या तो त्याच्याकडे तक्रार करतो, कि त्याचा एवढा भक्त असूनही त्याने त्याला वाचवलं नाही. तेव्हा देव हसून म्हणाला, " मी तुझ्याकडे एक माणूस, एक होडी आणि एक हेलीकाॕप्टर पाठवलं होतं. तू दिलेल्या संधीचा फायदा घेतला नाहीस." पुजार्याने आपल्या हट्टीपणामुळे सर्व संधी गमावल्या होत्या. 


मित्रांनो 👉तुमच्या आयुष्यात अशा असंख्य संधी येऊन जात असतात पण त्या क्षणाला तुम्हाला त्याची कल्पनाच नसते. एक छोटीशी संधी तुमच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देऊ शकते. म्हणून योग्य संधी कधीच हातची जाऊ देऊ नका.


संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, हदगाव

9403046894

=========ஜ۩۞۩ஜ=========


12 जुलै

*आम्ही active तंत्रस्नेही शिक्षक समूह*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣

*दिनांक : 12/07/2018  गुरूवार*

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••
1⃣ *मेडिकल केंद्रीय कोटयात ओबीसी आरक्षण देण्याच्या प्रकरणात हायकोर्टाने केंद्र व राज्य सरकारला  बजावली नोटीस*
-----------------------------------------------------
2⃣ *पीक कर्जापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही - सहकार मंत्री सुभाष देशमुख*
-----------------------------------------------------
3⃣ *आषाढीसाठी येणाऱ्या भक्तांना मिनरल वॉटरची सोय, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती*
-----------------------------------------------------
4⃣ *मुंबई : पावसाचा अंदाज घेऊन शाळांनी सुट्टीचा निर्णय घ्यावा - शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे*
-----------------------------------------------------
5⃣ *महावितरणला 30 हजार कोटी रुपयांचा तोटा. ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता.*
-----------------------------------------------------
6⃣ *जम्मू-काश्मीर- कुपवाडामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान शहीद*
-----------------------------------------------------
7⃣ *हॉकीला अच्छे दिन... केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने भारतीय पुरूष हॉकी 18 सदस्यीय संघातील प्रत्येक खेळाडूला 50 हजारांचा मासिक भत्ता देण्याचे केले जाहीर*
-----------------------------------------------------
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300

बुलेटीन

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. /07/2018 वार -
=========ஜ۩۞۩ஜ=========
🌷   📆 .  *दिनविशेष .  📆* 🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
💥 ठळक घडामोडी :- 

💥 जन्म :-

💥 मृत्यू :- 

*संकलक :- संतोष रहांगडाले गोंदिया*
📱  9404277298
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌷 *आजच्या ठळक बातम्या*🌷
=========ஜ۩۞۩ஜ=========
1⃣
-----------------------------------------------------
2⃣
-----------------------------------------------------
3⃣ 
-----------------------------------------------------
4⃣ 
-----------------------------------------------------
5⃣ 
-----------------------------------------------------
6⃣ 
-----------------------------------------------------
7⃣ 
-----------------------------------------------------
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
=========ஜ۩۞۩ஜ=========
      *✈  🚀  गुगलयान ✈ 🚀*
=========ஜ۩۞۩ஜ=========

वरील लेख पूर्ण वाचण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर टिचकी मारा.

आपले अभिप्राय जरूर द्यावे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ स्तंभलेखक 
*नागोराव सा. येवतीकर, धर्माबाद*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
=========ஜ۩۞۩ஜ=========
      🌷🍃  *विशेष माहिती* 🌷🍃
=========ஜ۩۞۩ஜ=========

*संकलन :- राजेंद्र महाजन, वेरूळ*
📱09403407550
=========ஜ۩۞۩ஜ=========
   🌹 *" फ्रेश सुविचार "* 🌹
=========ஜ۩۞۩ஜ=========

*संकलन :- सौ. भारती कुंभार, रायगड*
 📱  9850296824
=========ஜ۩۞۩ஜ=========
       ❓ *आजची प्रश्नमंजुषा* ❓
=========ஜ۩۞۩ஜ=========

*संकलन : संगीता देशमुख, वसमत*
📱 9975704311
=========ஜ۩۞۩ஜ=========
🎂  *!!! आजचा वाढदिवस !!!* 🎂
=========ஜ۩۞۩ஜ=========

*सर्वाना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा*
     
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा एक दिवस अगोदर fmbuletin@gmail. com येथे mail करावे. ]
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *! ! ! @@ गुगली @@ ! ! !* 
=========ஜ۩۞۩ஜ=========

=========ஜ۩۞۩ஜ=========
🌟! !  *आजचा विचारधन* ! !🌟
=========ஜ۩۞۩ஜ=========

        *--संजय नलावडे, मुंबई*
         📱 9167937040
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *🎯 आजचे विचारवेध......✍🏻*
=========ஜ۩۞۩ஜ=========

*व्यंकटेश काटकर,नांदेड.*
  संवाद..९४२१८३९५९०/
            ८०८७९१७०६३.
=========ஜ۩۞۩ஜ=========
  *🎡 आजचा मराठी - इंग्रजी शब्द 🎡*
=========ஜ۩۞۩ஜ=========

=========ஜ۩۞۩ஜ=========
🎭 *आजची फ्रेश बोधकथा*  🎭
=========ஜ۩۞۩ஜ=========

*📝   संकलन*  📝
*संकलक :- प्रमिलाताई सेनकुडे, नांदेड*
जि.प.प्रा.शा. गोजेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
📱  9403046894
=========ஜ۩۞۩ஜ=========
आपल्या सूचना, निवेदन, अभिप्राय, बातम्या, वाढदिवस, माहिती किंवा शंका fmbuletin@gmail.com येथे कळवावे.
=========ஜ۩۞۩ஜ=========
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🎤 मुख्य संकलक-नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏* पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ACtive

*आम्ही active तंत्रस्नेही शिक्षक समूह*

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

2⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 2⃣

*दिनांक : /07/2018  वार*

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
•••••••••••••••••••••••••••••••••••••
1⃣
-----------------------------------------------------
2⃣
-----------------------------------------------------
3⃣ 
-----------------------------------------------------
4⃣
-----------------------------------------------------
5⃣ 
-----------------------------------------------------
6⃣ 
-----------------------------------------------------
7⃣ 
-----------------------------------------------------
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300